कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित खेळ मांडियेला हा कार्यक्रम शनिवार (18 मार्च) रोजी तळेगाव दाभाडे शहरात मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात मनीषा भुषण वाणी या सौभाग्यवती मावळ 2023 च्या विजेत्या ठरल्या. त्यांना प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी, दुचाकी मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आली.
महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाला अधिक खास करण्यासाठी खास निवेदक म्हणून होम मिनिस्टर फेम प्रसिद्ध कलाकार आदेश बांदेकर हे उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke wife Sarika Shelke Khel Mandiyela Program Talegaon Dabhade Maval Adesh Bandekar Present )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या कुलस्वामिनी महिला मंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्या माध्यमातून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त तळेगाव दाभाडे शहरच नाही तर मावळ तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला भगिनी कार्यक्रमाला उपस्थित झाल्या होत्या.
अधिक वाचा –
– ब्राम्हणोली येथील श्री भैरवनाथ देवाचा उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात; 22 मार्चला काल्याचे कीर्तन
– नागरी समस्या : ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर देण्याची मागणी, नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी कामगार सेलचे एजन्सीला निवेदन