भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय वडगाव मावळ येथे आज (बुधवार, 1 फेब्रुवारी) रोजी मावळ भाजपाची मासिक आढावा बैठक तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते शांताराम बापू काजळे यांनी स्व. आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी केलेल्या कार्याची आठवण सांगत त्याचे स्मारक उभे करण्यात यावे, अशी इच्छा सदर बैठकीत मांडली. ( Monthly Meeting of Maval BJP Concluded At Vadgaon )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यासोबतच कार्यकर्त्यांना विचारत न घेता कोणत्याही नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करून घेऊ नये, असा ठराव देखील याबैठकीत मान्य करण्यात आला. तसेच यावेळी शिळींब गावच्या मनीषा हरिष चोरघे यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ मंजुरीचे पत्र वाटप केले.
यावेळी माजी सभापती गुलाब म्हाळसकर, युवा नेते नितीन घोटकुले, महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, किरण राक्षे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, देहुगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, संतोष राक्षे, मा सरपंच गणेश कल्हाटकर, चिखलसे गावचे सरपंच सचिन काजळे, कोथूर्णे गावचे सरपंच प्रमोद दळवी, सीमा अहेर, कल्याणी ठाकर, शत्रुघ्न धनवे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ
– गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा!