व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, February 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढले खुर्द गावात मोठी घरफोडी, अज्ञात चोरट्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखभर रुपयांचा मुद्देमाल लंपास

मावळ तालुक्यातील आढले ( खुर्द ) इथे घरफोडीची मोठी घटना घडली आहे. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत तब्बल 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Thievish

File Photo : Thievish


मावळ तालुक्यातील आढले ( खुर्द ) इथे घरफोडीची मोठी घटना घडली आहे. घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत तब्बल 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फिर्यादी मयुर मनोहर भोईर (वय 24 वर्षे, व्या. – नोकरी, रा. आढले (खुर्द), ता. मावळ, जि. पुणे) यांनी या प्रकरणी शिरगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( More Than 1 Lakh Burglary In Adhale Khurd Village Of Maval Taluka Case Registered Against Unknown Thief In Shirgaon Police Station )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते ते दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान मौजे आढले (खुर्द) (तालुका मावळ, जिल्हा पुणे) इथे ही घटना घडली. फिर्यादी हे घराचे कुलुप लावुन चुलत्यांच्या घरी झोपण्यासाठी गेले होते. तसेच फिर्यादी यांचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी, मुलगी सासुरवाडी (बो-होडेवस्ती मोशी) इथे त्यांच्याही राहत्या घराला कुलुप लावुन गेले होते.

तेव्हा कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी आणि त्यांचा चुलत भाऊ यांच्या राहत्या घराचे कुलुप आणि कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश कला. घरातील 47,000 रुपये किंमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोने व वेगवेगळे दागिणे, 5,000 रुपये किंमतीचे 1.5 ग्रॅम चांदीचे वेगवेगळे दागिने, 65,000 रुपये रोख आणि 1,500 रुपये किंमतीचे घड्याळ असे एकुण 1,18,500 रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणी इतर माल नमुद अज्ञात आरोपीने चोरी करून नेला, असे फिर्यादीत नमुद असून त्यानुसार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप निरिक्षक गावित हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

अधिक वाचा –

– माळवाडीत पोलिसांसमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी, 5 जणांवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
– घरातून निघून गेलेल्या तरुणाचा तळेगाव दाभाडे शहरातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ


Previous Post

माळवाडीत पोलिसांसमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी, 5 जणांवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

Next Post

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम, मुलींमध्ये ‘हिने’ मारली बाजी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MPSC

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात प्रथम, मुलींमध्ये 'हिने' मारली बाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी

February 26, 2026
Prashantdada Bhagwat Yuva Manch organizes Shri Kshetra Vadhu Budruk Tulapur Samadhi Darshan Yatra

प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे मावळ तालुक्यातील शंभूभक्तांसाठी श्रीक्षेत्र वढू बु. आणि श्रीक्षेत्र तुळापूर समाधी दर्शन यात्रा

February 26, 2026
New executive committee of Maval Taluka Warkari Mandal announced

मावळ तालुका वारकरी मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर

February 25, 2026
Maval Land Records Office Maval Bhumi Abhilekh

मावळातील भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार प्रभारींच्या हाती ; उपअधीक्षक सहीत चार पदांवर पूर्णवेळ अधिकारीच नाही

February 25, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

February 25, 2026
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

February 25, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.