महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीतर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल मंगळवारी (28 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आला. आयोगाकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
या परीक्षेत प्रमोद चौगुले याने सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटील याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला मधून सोनाली मात्रे हिने पहिला क्रमांक मिळवला आहे. ( MPSC Exam 2021 Result Declared Pramod Chaugule first in maharashtra state )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जा.क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://t.co/mvqvTXj3hE pic.twitter.com/6mRxFBzdRT
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 28, 2023
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार अशा एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता उमेदवारांना दिनांक 3 मार्च ते 10 या कालावधीत पदासाठी पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येणार आहेत.
अधिक वाचा –
– पवनानगरमधील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध विज्ञान प्रकल्प सादर
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर