व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगरमधील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून विविध विज्ञान प्रकल्प सादर

राष्ट्रीय विज्ञान दिन (28 फेब्रुवारी) याचे औचित्य साधून संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथील विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sankalp-English-School-Pavananagar

Photo Courtesy : Rahul Sonavne


आजचे विद्यार्थी हे उद्याच्या विकसित भारताचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव अशी मूल्ये जोपासत असताना त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन देखील जोपासणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील देशाच्या वैज्ञानिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे, असे मत संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी व्यक्त केले. संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथील विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ( Science Project Exhibition at Sankalp English School Pavananagar on the occasion of National Science Day 28 February )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे (28 फेब्रुवारी) औचित्य साधून विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय कालेकर, संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, उपाध्यक्ष पोपटशेठ कालेकर, काले गावचे सरपंच खंडू शेठ कालेकर, मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे, पोलिस पाटील सीमा यादव, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नितीन वाघमारे, देवीदास कालेकर, अरविंद रोकडे, शरद सोनवणे, मुख्याध्यापक राहुल सोनवणे आणि पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी यावेळी विविध प्रकल्प सादर केले. त्यामधे प्रामुख्याने जलचक्र, रेनवॉटर हार्वेस्टिंग, हायड्रॉलिक वेट लिफ्टिंग, वातावरण बदल, लिफ्ट, चिली कटर, शहर आणि ग्रामीण भागातील फरक, होलोग्राम, विंडमिल, जल शुद्धीकरण, आकाशगंगा, इलेक्ट्रॉनिक्स बेल, डे नाइट, टाईप ऑफ हाऊस, व्हॅक्युम क्लिनर असे विविध प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी सादर केले.

हेही वाचा – वडगाव शहरात सामान्यांसाठी ग्रंथालय, मराठीतील दर्जेदार पुस्तके मोफत वाचता येणार, नगराध्यक्ष ढोरेंचा स्तुत्य उपक्रम

कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभाग प्रमुख मीनाक्षी शिवणेकर, नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, प्रियांका येवले, वैष्णवी काळे, सुजाता वाघेरे, आशा बोरकर, निकिता कालेकर आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी तर आभार उपमुख्याध्यापिका नीता कालेकर यांनी मानले.

अधिक वाचा –

– माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर


Previous Post

वडगाव शहरात सामान्यांसाठी ग्रंथालय, मराठीतील दर्जेदार पुस्तके मोफत वाचता येणार, नगराध्यक्ष ढोरेंचा स्तुत्य उपक्रम

Next Post

माळवाडीत पोलिसांसमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी, 5 जणांवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-MIDC-Police-Station

माळवाडीत पोलिसांसमोरच दोन गटांत तुंबळ हाणामारी, 5 जणांवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
24 year old youth drowned in the Indrayani river at Kundamala near Talegaon Dabhade

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

April 19, 2026
Maval Panchayat Samiti Chairperson Sunita Yewle elected as member of committee of Pune Zilla Parishad

मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनीता मनोज येवले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या ‘या’ महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड

April 19, 2026
MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.