Dainik Maval News : ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलेला मिळावा व योजनेतील अपात्र महिला लाभार्थ्यांची संख्या कमी करून राज्याच्या तिजोरीवर भार कमी करावा यासाठी आता राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना घरी जाऊन ‘लाडक्या बहिणीं’ची आर्थिक परिस्थिती तपासण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत असून त्यामुळे या योजनेतून मोठ्या प्रमाणावर अपात्र महिलांची नावे कापली जाण्याची शक्यता आहे.
- ज्या महिलांच्या घरी चारचाकी असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास संबंधित महिलांचा 1500 रुपयांचा लाभ तत्काळ थांबवण्यात येणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
यापूर्वीच 5 लाख लाभार्थी वगळल्या :
राज्य सरकारने गेल्या महिन्यात या योजनेतून 5 लाख लाभार्थ्यांची नावे रद्द केली होती. महिलांचे वय, महिलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारी वित्तीय मदत, ‘नमो किसान योजने’चा लाभ घेणाऱ्या महिला, महाराष्ट्रातील निवासी नसलेल्या महिला अशा महिलांची नावे वगळली असून सध्या या योजनेत 2.46 कोटी लाभार्थी आहेत.
- लाडकी बहीण योजनेतील अर्जांची राज्य सरकार कसून छाननी करणार नाही. ज्या प्रकरणांमध्ये तक्रारी आल्या आहेत अशा प्रकरणांचीच पडताळणी केली जाईल, अशी भूमिका सरकारने जाहीर केली असली तरी मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना आधार कार्ड, बँक खाते, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, निवासी दाखला, चारचाकी व सरकारी नोकरी आदी तपशील तपासायला सांगितले आहेत.
‘चारचाकी’वाल्या बहिणींचे पैसे होणार बंद…
कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असे सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आले होते. तरीही या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान