व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळेनात । Ladki Bahin Yojana

गतवर्षी जुलै महिन्यात तत्कालीन महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Majhi Ladki Bahin scheme

Photo Courtesy : CMO


Dainik Maval News : गतवर्षी जुलै महिन्यात तत्कालीन महायुती सरकारने मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानंतर अगदी निवडणूक होईपर्यंत या योजनेच्या अर्ज पडताळणीचे काम पाहिजे तसे प्रामाणिकपणे करण्यात आले नाही, त्यामुळे योजनेतील पात्र महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. परंतु आता राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यानंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरु झाली आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या महिलांच्या घरी चारचाकी आहे, त्याबरोबरच ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज भरताना चुकीचे आधार क्रमांक दिले, त्यांचीही माहिती घेण्यात येत आहे.

  • अशात कागदपत्रांची पडताळणी होत असताना योजनेसाठी सुरूवातीला अर्ज भरत असताना महिलांनी चुकीची माहिती दिल्याचे समोर आले आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात सोळा हजार लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे. योजनेसाठी अर्ज केलेल्या बहिणींचा आधार क्रमांक आणि कागदपत्रे जुळत नाहीत, अशा 16 हजार बहिणींची माहिती घेऊन अद्ययावत करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख 11 हजार 991 बहिणींनी योजनेसाठी अर्ज करण्यात आले होते. राज्य सरकारकडून योजनेच्या निकषानुसार अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना अगोदर स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याला जास्त प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने ज्या लाभार्थ्यांच्या किंवा कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांची यादी परिवहन विभागाकडून घेतली. त्या लाभार्थी महिलांची सध्या पडताळणी सुरू आहे.

माहिती अद्ययावत करण्याचे काम :
गावपातळीवरती अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करणे शक्य नसल्यामुळे पर्यवेक्षकांच्या माध्यमातून सध्या पडताळणीचे काम सुरू आहे. ज्या लाभार्थी महिलांनी चुकीची कागदपत्रे व आधार क्रमांक दिले आहेत, त्यांचीही माहिती अद्ययावत करण्याचे काम प्रशासन करत आहे. अशातच ज्या महिलांनी चुकीची माहिती भरली आहे, त्यांची देखील पडताळणी सुरू आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

लाडक्या बहिणींच्या घरी येणार अंगणवाडी सेविका ; लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कागपत्रांची छाननी सुरू । Ladki Bahin Yojana

Next Post

‘जानी दुश्मन’ चित्रपटातील अभिनेते अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी । Robbery at Actor Armaan Kohli House

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft at actor Armaan Kohli house in Lonavala

'जानी दुश्मन' चित्रपटातील अभिनेते अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी । Robbery at Actor Armaan Kohli House

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
Traditional Leki Magne game celebrated in Pawan Maval after ganesh utsav

पवन मावळात ‘लेकी मागण्याचा’ पारंपरिक खेळ उत्साहात ; फुगड्या, गाणी अन् विनोदी लग्नसोहळ्याने रंगत

September 21, 2026
450 players participate in Maval Taluka inter school chess tournament at Blooming International School Gahunje

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूल येथे मावळ तालुका आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत ४५० खेळाडूंचा सहभाग

September 21, 2026
Ganesh Mandals in Vadgaon city cancel immersion processions against backdrop of tragic incidents

दुःखद घटनांच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहरात गणेश मंडळांकडून विसर्जन मिरवणुका रद्द ; साधेपणाने बाप्पाला निरोप

September 21, 2026
Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.