शिवसेना ( Shiv Sena ) हा शिवसैनिकांचा पक्ष. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक ( Shivsainik ) शाखांद्वारे शिवसेनेशी जोडले आहेत. अशा शिवसैनिकांवर एकनाथ शिंदे ( Eknatyh Shinde ) यांच्या बंडामुळे मोठा आघात झाला. नेमकी कोणती बाजू खरी किंवा शिवसैनिक म्हणून कोणत्या बाजूला उभे रहावे, यात शिवसैनिकांचा गोंधळ उडाला. मात्र, अनेक शिवसैनिकांंनी जिथे ठाकरे तिथे शिवसेना असा विचार करुन उद्धव ठाकरे यांच्या ( Uddhav Thackeary ) पाठीशी उभे राहायचे ठरवले. असाच शिवसेनेचा एक निष्ठावंत शिवसैनिक मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) सावळा ( Savla Village ) गावचा मावळा दादर येथील शिवाजी पार्कवर ( Shivaji Park ) होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ( Dasara Melava ) पायीच मुंबईला निघाला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील सावळा या गावचे निष्ठावान शिवसैनिक शोभीनाथ भोईर हे मुंबईतील शिवतीर्थ येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शनिवार, 1 ऑक्टोबर रोजी पायी निघाले आहेत. त्यांचे कान्हे येथे उपतालुकाप्रमुख मदन शेडगे आणि ग्रामस्थांकडून शाल-श्रीफळ देऊन, फेटा बांधून स्वागत करण्यात आले. शनिवारी त्यांनी एका दिवसात 40 किमी अंतर पुर्ण केले. शनिवारी त्यांचा मुक्काम वडगाव येथे जयदास ठाकर यांच्या घरी होता. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला ते मुंबईत पोहोचणार आहेत. ( Mumbai Dadar Shivaji Park Shivtirth Dussehra Gathering Melava Shiv Sainiks left on Foot From Maval Taluka )
अधिक वाचा –
शिवतीर्थावर घुमणार आव्वाज ठाकरेंचा..! कोर्टाच्या निर्णयानंतर मावळमधील शिवसैनिकांचा जल्लोष, पाहा Video
‘वेदांता-फॉक्सकॉन कंपनी सोबत तत्कालीन ठाकरे सरकारचा कोणताही MOU नाही’, महायुतीच्या आंदोलनात खुलासा