मुंबईची लोकल ट्रेन ही जणू सर्वसामान्य मुंबईकरांसाठी त्यांचं दुसरं घरंच आहे. लोकल बंद तेव्हा मुंबई बंद हे तर संपूर्ण जगाने कोरोना काळात पाहिलं . मुंबईतील प्रत्येक सण, उत्सव इतकंच काय तर कुठल्याही लहान मोठ्या इव्हेंटचा परिणाम लोकल ट्रेनमध्ये दिसून येतो.
ट्रेनमधील प्रवासी देखील सवयीने एकमेकांचे जीवलग बनून जातात. त्यामुळेच सोशल मीडियावर मुंबईच्या लोकल ट्रेन्समधील अनेक भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर आपण कल्पनाही करु शकत नाही, असे असतात. ( Mumbai Local Train Students Group Viral Video On Song Ramach Nandan )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#रमाचं_नांदणं पोरांनी अगदी महौलच बनवला राव. मुंबईच्या ट्रेनमधला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल.#Mumbai #Local #Train #ViralVideo #मुंबई #लोकल #ट्रेन #व्हायरल #व्हिडिओ #म pic.twitter.com/RWJYvom8r5
— Dainik Maval I दैनिक मावळ (@DainikMaval) February 21, 2023
लोकल ट्रेनमध्ये गरबा खेळणे असो, भजन गाणे असो, डान्स असो किंवा आणखीन बरंच काही. अहो इतकंच काय राडा देखील बघावा तर मुंबईच्या लोकल ट्रेनमधलाच असेही काही व्हिडिओ समोर आलेत. मात्र, सध्या लोकलच्या ट्रेनमधला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ सर्वांनाच मंत्रमुग्ध करत आहे.
#रमाचं_नांदणं पोरांनी अगदी महौलच बनवला राव. मुंबईच्या ट्रेनमधला हा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल.#Mumbai #Local #Train #ViralVideo #मुंबई #लोकल #ट्रेन #व्हायरल #व्हिडिओ #म pic.twitter.com/RWJYvom8r5
— Dainik Maval दैनिक मावळ (@DainikMaval) February 21, 2023
हल्ली भीमगीतांची वाढती क्रेझ आपण पाहतच आहोत. अशात मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तरुणाईच्या एका ग्रुपने ‘रमाचं नांदणं’ गाण्यावर अगदी महौल बनवून टाकला होता. हा व्हिडिओ सध्या सोशलवर जोरात व्हायरल होत आहे.
अधिक वाचा –
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री, बुधवारी रोड शोसह होणार जाहीर सभा, वाचा अधिक