मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कुणेनामा पुल (खंडाळा ) इथे काही दिवसांपूर्वी केमिकलने भरलेल्या टँकरचा अपघात झाला होता. या अपघातावेळी पुलाखालून जात असलेले राजमाची येथील आदिवासी कुटुंबातील तीन जण गंभीररित्या जखमी होऊन मृत पावले. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला होता. राजमाची येथील सदर वरे कुटुंबीयांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी रविवारी (दिनांक 25 जून) भेट घेतली आणि सांत्वन केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर कुणे गावाजवळ मंगळवार, दिनांक 13 जून रोजी हा अपघात घडला होता. यात सविता कैलास वरे (वय 34 वर्ष) त्यांचा मुलगा कुशल कैलास वरे ( वय 8 वर्ष ) आणि त्यांचा भाचा रितेश पोशिरे ( वय 18 वर्ष ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेऊन वरे -पोशिरे कुटुंबियांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर रविवारी बाळा भेगडे यांनी प्रत्यक्ष राजमाची (कुणे) नामा याठिकाणी जाऊन वरे-पोशिरे कुटुंबीयांची भेट घेतली. ( mumbai pune expressway tanker accident former minister bala bhegade consoled family from rajmachi )
अधिक वाचा –
– ‘सर्व्हर डाऊन’मुळे मावळ तहसील कार्यालयाकडून दाखल्यांची दिरंगाई; हेलपाटे मारुन विद्यार्थी मेटाकुटीला
– आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय, वडगावकरांकडून स्वागत