मुंबई – पुणे महामार्गावर बोरघाटात 15 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बस अपघातानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे तातडीने अंडा पॉईंट आणि शिंग्रोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूस असलेल्या वाय जंक्शनवर हाईट बॅरिकेट्स उभारले गेले होते. त्यामुळे मोठी वाहने चुकीच्या मार्गाने खोपोली दिशेने येणे जवळजवळ बंद झाले होते आणि अपघातावर अंकुश बसला होता.
परंतू दुर्दैवाने अंडा पॉईंट येथील हाईट बॅरिकेट्स दोन ते तीन वेळा मोठ्या वाहनांच्या धडकेमुळे निकामी झाला. त्याला रिपेअर करण्यात आले होते. परंतू पुनश्च एकदा अंडा पॉईंट येथील हाईट बॅरिकेट्सला एका डंपरने धडक दिली, त्यामुळे तो पुन्हा उभारण्यासंबंधी अजून कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यात आज शिंग्रोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूस असलेल्या वाय जंक्शन येथे उभारलेल्या हाईट बॅरिकेट्सचे अज्ञात वाहन धडकल्याने नुकसान झाले असून तो कधीही तुटण्याची शक्यता आहे.
तहसीलदार कार्यालय खोपोली, खोपोली पोलीस स्टेशन, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, आर टी ओ आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून हाईट बॅरिकेट्स उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र एमएसआरडीसी कडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सलग लागलेल्या सुट्ट्यामुळे महामार्गावर वाहतुकी कोंडीची समस्या निर्माण होत असताना हाईट बॅरिकेट्स निकामी झाल्यास एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयआरबी कंपनीकडून बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांनी या तुटलेल्या बॅरिकेट्सची डागडुजी करवून घेतली आहे. मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. ( Mumbai Pune Highway borghat height barricades get defective )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवना शिक्षण संकुलाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ जनजागृती रॅली
– दैनिक मावळ बुलेटीन : मावळ मनसेत ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; मावळ लोकसभा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
– मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरात “हर घर तिरंगा” अभियानामुळे राष्ट्रप्रेमाचे उत्स्फूर्त दर्शन