व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई ते पुणे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार, सह्याद्रीच्या डोंगररांगेतून जाणारा रस्ता अंतिम टप्प्यात । Mumbai Pune Missing Link

मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी मिसिंग लिंकचे काम वेगाने सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 26, 2025
in महाराष्ट्र, पुणे, शहर
Mumbai Pune missing link project

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी मिसिंग लिंकचे काम वेगाने सुरू आहे. राज्य सरकारचा हा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या जूनपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे मार्गाचे अंतर 6 किमीने कमी होणार असून तब्बल तीस मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव येथे 13.3 किमीच्या पर्यायी रस्ताचे काम एमएसआरडीसीकडून सोपवण्यात आले आहे. या रस्त्यावर लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या 19.8 किमी अंतराच्या बोगद्यांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

जिथे मिसिंग लिंकचे काम सुरू आहे तो डोंगरभाग असून 130 मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे काम पूर्णतः बंद करावे लागते. त्यामुळं यंदा पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.

  • मुंबई-पुणे मिसिंग लिंकमुळं लोणावळा घाटातील होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येतायत. त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किमी इतकी आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.  या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर 6  किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. जून 2025 मध्ये मुंबई-पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी


Previous Post

मावळमधील आश्रम शाळेत अल्पवयीन मुलांवर अत्याचार, आरोपी शिक्षकाला अटक ; नीलम गोऱ्हे यांच्याकडून घटनेची गंभीर दखल

Next Post

दुर्गम भागातील आजिवली शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, रोटरी क्लबचा उपक्रम । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Free sanitary napkins to students of Ajivli schools in remote areas an initiative of Rotary Club Maval

दुर्गम भागातील आजिवली शाळेतील विद्यार्थीनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन, रोटरी क्लबचा उपक्रम । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.