वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 16-मध्ये मागील एक वर्षापासून खंडोबा मंदिर ते एम.आय.डी.सी रोड पर्यंतच्या साखळी रस्त्याचे काम सुरू असून या कामास काही ठिकाणी नागरिकांनी अडवणूक केल्याने रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत पडले आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात खड्ड्यांतून जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. ह्याच अनुषंगाने वडगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी शुक्रवारी (दिनांक 25 ऑगस्ट) ऑन फिल्डवर येऊन एम.आय.डी.सी कडे जाणाऱ्या साखळी रस्त्याची पाहणी केली.
प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी रस्ता रुंदीकरणास येणारा अडथळा संबंधित शेतकऱ्यांना आवाहन करून त्वरित काढून टाकण्यात सांगण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून नुकतीच मोजणी करण्यात आली असून लवकरच रस्त्याची हद्द निश्चित करून त्या ठिकाणचीही काम पूर्ण करण्यात येईल. तसेच पुढील काळात रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून नगरपंचायत मार्फत त्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुख-सुविधा बंद करण्यात येईल, असा इशारा निकम यांनी यावेळी बोलताना दिला.
याप्रसंगी रस्ता रुंदीकरणास विशेष सहकार्य केल्याबद्दल उद्योजक मंगेश काका ढोरे यांचे आभार मानण्यात आले. माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, अभियंता अनिल कुंभार, समाधान पवार आदी यावेळी उपस्थित होते. ( Municipal administration in active mode regarding Vadgaon chain road work )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तालुक्यात सर्वाधिक बक्षिसे जिंकत पवनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं; ‘गावात राहत असलो तरी बुद्धीच्या स्पर्धेत शिखरावर आहे’
– लोणावळा पोलिसांची कर्तव्यदक्षता! पर्यटकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि सुरक्षिततेसाठी केल्यात विशेष उपाययोजना
– टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश