देहूरोड इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड येथील ईदगाह मस्जिद इथे मुस्लीम धर्मगुरुला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या पत्नीला देखील मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. ( Muslim Cleric And His Wife Beaten Up In Dehu Road Pune )
देहुरोड पोलिस ठाण्यात याबाबत संबंधित मुस्लीम धर्मगुरुच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी 1) अमीन शेख (रा देहुरोड बाजार) आणि आरोपी 2) जलील शेख (रा जामा मस्जीद देहुरोड जवळ देहुरोड) यांच्यावर देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 06 मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ईदगाह मस्जिद कब्रस्तान देहुरोड इथे हा प्रकार घडला. याप्रकरणी सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक 1 आणि आरोपी क्रमांक 2 यांनी फिर्यादी महिला यांच्या पतीला शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना आणि फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या खासगी भागांना स्पर्श करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक गोवले हे करत आहेत.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात धूलिवंदन सणाला गालबोट! रंगलेले हातपाय धुवायला इंद्रायणी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
– देहूरोड कॅन्टोन्मेंट रेड झोन प्रश्नाबाबत लवकरच संरक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत संयुक्त बैठक – बाळा भेगडे