ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे आणि लोणावळा या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या स्वच्छता अभियानात श्री सदस्यांनी तब्बल 27 टन कचरा गोळा केला. ( Nanasaheb Dharmadhikari Pratishthan Revdanda Maha Swachhata Abhiyan In Maval Taluka Collected 27 Tons Of Garbage )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ तालुक्यात लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या दोन ठिकाणी सकाळी 7:30 ते 11:00 वाजेच्या दरम्यान महा स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात एकुण 19 श्रीबैठकीतील सुमारे 1331 श्रीसदस्य सहभागी झाले होते. दोन्ही ठिकाणच्या स्वच्छता अभियानात मिळून एकूण 1143 किलो ओला कचरा आणि 26,294 किलो सुखा कचरा म्हणजे जवळपास 27 टन कचरा गोळा करण्यात आला. तसेच एकूण 76.5 किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा ही स्वच्छता करण्यात आली.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जातात. खूप मोठ्या संख्येने श्री सदस्य या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. यावर्षी तीर्थस्वरुप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियानासोबतच श्री सदस्यांनी स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा यंदाचा महास्वच्छता अभियानाचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नागरिकांनी म्हटले. तसेच, यामुळे स्वच्छते विषयची जनजागृती घराघरांत पोहोचण्यास मदत झाली आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी
– मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, यापुढे समितीद्वारे होणार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांची निवड