Dainik Maval News : अभियांत्रिकी कामासाठी रेल्वेकडून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे गेट नंबर 32 हा दिनांक 16 नोव्हेंबर पासून बंद करण्यात आला होता. आता गुरुवार, दिनांक 5 डिसेंबर पासून तो पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
सिग्नल यंत्रणेच्या महत्वाच्या कामासोबत गेटच्या दुतर्फा रस्ता काँक्रिटीकरण व रेल्वे मार्गामध्ये ब्लॉक बसवणे ही कामे या दिवसांत करण्यात आली आहेत. त्यामुळे रेल्वे गेटमध्ये व गेटच्या दुतर्फा रस्त्यावर पडणारे खड्डे हे कमी होणार आहेत. तसेच नांगरगावच्या बाजूला साचणारे पाण्याची समस्या देखील सुटणार आहे. त्यामुळे भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
भांगरवाडी रेल्वे गेट मार्गे दैनंदिन हजारो नागरिकांची ये – जा सुरू असते. नांगरगाव भांगरवाडी, कुसगाव, लोणावळा बाजारपेठ या भागात जाणारे स्थानिक नागरिक बहुतांश प्रमाणात याच मार्गाचा वापर करतात. तसेच, पर्यटनासाठी येणारे पर्यटक हे देखील गुगल मॅपच्या माध्यमातून याच मार्गे जात असल्याने भांगरवाडी रेल्वे गेटवर दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होत असते.
परंतु, जवळ जाण्यासाठी हाच महत्त्वाचा मार्ग असल्याने याचा सर्वाधिक वापर केला जातो. गेली 20 दिवस गेट बंद असल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते. मात्र आता रेल्वे गेटच्या दुतर्फा सिमेंटचा चांगला रस्ता झाला असल्याने व गेट वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देवाभाऊ 3.0 : “मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…” राज्यात नव्या ‘देवेंद्र’पर्वाचा आरंभ । Maharashtra New CM
– मुख्यमंत्री बनताच देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर, पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
– “मी अजित आशाताई अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की… अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ