Dainik Maval News : अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सोमाटणे येथे सोमवारी (दि.2) रात्री नऊच्या सुमारास गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
संजीत उर्फ वेपन विजेद्र यादव (वय 22, रा. जाधववस्ती, रावेत) असे यात अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार गोविंद डोके यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाटा येथे एक जण येणार असून त्याच्याकडे अंमली पदार्थ आहेत, अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2 लाख 25 हजार 500 रुपयांचे 22.55 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत अंमली पदार्थ मिळून आले.
तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली 65 हजार रुपयांची दुचाकी आणि एक महागडा मोबाइल असा एकूण 3 लाख 25 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीने सदरहू हा अंमली पदार्थ नालासोपारा, मुंबई येथील त्याचा मित्र इमरान याच्याकडून आणल्याचे चौकशीत सांगितले. तळेगाव दाभाडे पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.
अधिक वाचा –
– कुंडमळा येथे वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृतदेह सापडला । Talegaon Dabhade
– ‘मी मावळ विधानसभेसाठी इच्छुक… कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार’ : बापूसाहेब भेगडे
– दोन वर्षानंतर सरकारला आली जाग ! कोथुर्णे येथील पीडित मुलीच्या परिवारास 5 लाखांची मदत