Dainik Maval News : सध्या गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सव सुरू असला तरीही राजकीय नेत्यांचे लक्ष मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणूकीवर लागलेले आहे. त्यामुळे विधानसभेच्या तयारीच्या अनुषंगाने मतदारसंघातील विविध पक्षातील भावी आमदार, इच्छुक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गणेशोत्सवाचे निमित्त करून गणेश मंडळांना भेटी देवून आपला जनसंपर्क मजबूत करण्याचे काम अनेकजण करताना दिसत आहे. मावळ राष्ट्रवादीचे जुणेजाणते नेतृत्व तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे हे देखील मावळ विधानसभेसाठी इच्छुक असून गणेश मंडळांच्या गाठीभेटी घेत त्यांनीही विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, तथा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी पत्रकार परिषद घेत मावळ विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता गणेश उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील प्रत्येक गावात गावभेट दौरा आणि गणेश मंडळांच्या भेटी गाठी घेण्यात येत आहे.
या दौऱ्याला पवनमावळ मधून सुरूवात झाली. त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. हा दौरा यामुळे तालुक्याच चर्चेचा विषय बनला आहे. बापू भेगडे यांनी जणू मावळ विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. तस तसे सर्व पक्षांकडून मतदार संघात मोर्चे बांधणीला सुरूवात झाली आहे.
यंदा बापू आण्णा आमदार.. कार्यकर्त्यांची चर्चा
मावळ तालुक्यात गावभेट दौरा आणि गणेश मंडळांना भेटी देत असताना गावातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदा बापू आण्णा तुम्ही माघार घेऊ नका. यंदा आम्हाला तालुक्याचे आमदार म्हणून तुम्हाला बघायचे आहे, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे बापूसाहेब भेगडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News
– मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News