Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, युवा नेते युगेंद्र पवार, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोदसिंह गोतारने यांच्या प्रमुख उपस्थितीत वडगाव मावळ येथे मावळ विधानसभा आढावा बैठक संपन्न झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात बुथ कमिटी तयार करून तुतारी पक्षचिन्ह घराघरात पोहचविणे, स्थानिक तालुका स्तरावर विविध प्रश्नांवर आवाज उठविणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आंदोलन करणे व पक्ष वाढवण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युगेंद्र पवार हे पक्ष संघटना बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी, पक्षाने आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्षसंघटन आणि विस्ताराकडेही सर्वांनी विशेष लक्ष द्यायला हवे, भविष्यकाळात नागरिकांच्या समस्येसाठी आंदोलन उभे केले जाईल, असे सांगितले.
यावेळी आगामी काळातील निवडणुका विचारात घेऊन बीएलए नेमणे आणि बोगस मतदारांवर हरकती घेऊन मतदार याद्या दुरूस्त करणे याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग व प्रभारी मावळ अतुल राऊत, युवक अध्यक्ष विशाल वहिले, महिला अध्यक्षा रत्नमाला करंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीला मा जिल्हा परिषद सदस्य किसनराव कदम, देहुरोड शहराध्यक्ष मिकी कोचर, वडगाव शहराध्यक्ष सोमनाथ धोंगडे, कामशेत शहराध्यक्ष संतोष वीर, देहु शहराध्यक्ष संदिप शिंदे, तालुका युवती अध्यक्षा गायत्री रिले, उपाध्यक्ष माणिक गाडे, सुनिल शिंदे, सचिन कालेकर, दत्तात्रय गोसावी, काशिनाथ गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, कैलास गोरवे, विजय शिंदे, महेश केदारी, संतोष राक्षे, सुभाष भांडे, नरहरी वाजे, विनोद होगले, आदिनाथ मालपोटे, योगेश करवंदे, सुरज पुरी, अभिजीत शिनगारे, प्रतिक जांभळे, समीर सतेलू, अमोल जांभुळकर, रोहन गाडे, रोहिदास गाडे, अमित घेणंद, राहील तांबोळी यांच्यासह इतर सर्व फ्रंटल व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विनोद काळेबाग, गौतम सोनकांबळे व इतर काहींनी पक्षप्रवेश केला. तसेच, किसनराव कदम (तालुका कार्याध्यक्ष) विजय चंद्रकांत शिंदे (तालुका युवक कार्याध्यक्ष) प्रदीप सोपान शिंदे (युवक अध्यक्ष, तळेगाव दाभाडे गाव भाग) विशाल राजू पवार (विद्यार्थी अध्यक्ष, तळेगाव शहर) सुरज शांताराम मावकर (अध्यक्ष, नाणे मावळ पश्चिम विभाग) या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन रेल्वे मार्ग रद्द करा, प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा विरोध ; पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी
– तळेगाव–चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता
– मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा ! तळेगावच्या ‘या’ दोन्ही पठ्ठ्यांनी जिंकली इटलीतील आयरनमॅन स्पर्धा
– मावळात जमीन गैरव्यवहाराची आणखीन एक घटना ; तोतया माणूस उभा करून जमीन विकली, गुन्हा दाखल