राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी इथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांच्या विधानांवरून देशभर गदारोळ माजला आहे. आव्हाडांच्या विरोधकांनी तसेच भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट आणि विविध हिंदू संघटनांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. 4 जानेवारी) शिर्डी (जि. अहमदनगर) इथे कार्यकर्ता मेळावा होता. ह्याच मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त करताना काही वादग्रस्त विधाने केली आहेत. ‘प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यानंतर राज्यभरातील वातावरण तापले आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने तर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ( Ncp Sharad Pawar Group Leader MLA Jitendra Awhad Shocking Comment On Lord Shri Ram )
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?
- “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या शिबिरात बोलताना उपस्थित केला.
तसेच शिबिरानंतर माध्यमांनी जेव्हा आव्हाडांना पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा आव्हाड म्हणाले की, “मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील 80 टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत.”
अधिक वाचा –
– मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास
– पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat
– आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election