व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी इथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 4, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Jitendra-Awhad-On-Shri-Ram

Photo Courtesy : Team Dainik Maval


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी इथे झालेल्या पक्षाच्या शिबिरात हिंदूंचे आराध्य प्रभू श्रीराम यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यांच्या विधानांवरून देशभर गदारोळ माजला आहे. आव्हाडांच्या विरोधकांनी तसेच भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट आणि विविध हिंदू संघटनांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (दि. 4 जानेवारी) शिर्डी (जि. अहमदनगर) इथे कार्यकर्ता मेळावा होता. ह्याच मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त करताना काही वादग्रस्त विधाने केली आहेत. ‘प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणालेत. त्यानंतर राज्यभरातील वातावरण तापले आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने तर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ( Ncp Sharad Pawar Group Leader MLA Jitendra Awhad Shocking Comment On Lord Shri Ram )

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

  • “राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. 14 वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या शिबिरात बोलताना उपस्थित केला.

तसेच शिबिरानंतर माध्यमांनी जेव्हा आव्हाडांना पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा आव्हाड म्हणाले की, “मी कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनवले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील 80 टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत.”

अधिक वाचा –
– मावळसह पुणे जिल्ह्याचे नाव जगभर गाजवणारी सुवर्णकन्या तृप्ती निंबळे! वाचा वारू गावच्या लेकीचा आदर्शवत क्रीडाप्रवास
– पुढील 5 वर्षासाठी केलेल्या वाढीव कर मूल्यांकनाबाबत वडगाव नगरपंचायत प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी । Vadgaon Nagar Panchayat
– आम आदमी पार्टी मावळ लोकसभेची जागा लढवणार! पिंपरी-चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे इच्छुक । Maval Lok Sabha Election


dainik maval jahirat

Previous Post

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान, वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Next Post

वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
driving-training-camp

वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.