राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात गुरुवारी (दि. 7 मार्च) कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या मेळाव्याला स्वतः शरद पवार उपस्थित राहणार आहेत. लोणावळा शहरातील हॉटेल कुमार रिसॉर्ट येथे सकाळी 10 वाजता पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी दैनिक मावळला दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) अचानक लोणावळा शहर युवक अध्यक्ष बदलला. त्यामुळे लोणावळा शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. त्यातूनच पुढे तब्बल 137 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सामूहिक राजीनामे दिले. या प्रकाराने मावळ तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी लोणावळ्यातील या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसेच यशवंत पायगुडे यांसह काही निवडक कार्यकर्त्यांना घेऊन सिल्व्हर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. ( NCP Sharadchandra Pawar Party Worker Dialogue Rally In Lonavala Sharad Pawar Will Be Present )
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. 4) सकाळी दहा वाजता शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हा शरद पवारांनी नाराज पदाधिकाऱ्यांची दखल घेतली, तसेच लोणावळा येथे मेळाव्याला येण्यास होकार दर्शवला. शरद पवार गुरुवारी (दि. 7 मार्च) लोणावळा आणि मावळातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेणार आहेत, अशी माहिती यशवंत पायगुडे, तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, विनोद होगले, संतोष कचरे, फिरोज शेख आदींनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
शरद पवार हे स्वतः आता मावळात येणार आहेत, त्यामुळे फक्त लोणावळाच नाहीतर तालुक्यातील इतर पक्षातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादीतील नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते हे तुतारी वाजवणार, अशी जोरदार चर्चा सध्या होत आहे.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रक आणि ट्रेलर यांच्या धडकेत 2 जण जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– एका दुचाकी चोराला पकडले आणि चोरीला गेलेल्या 19 दुचाकींचा शोध लागला! तळेगाव दाभाडे पोलिसांची भन्नाट कामगिरी । Talegaon Dabhade
– वेहेरगाव जिल्हा परिषद शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा; माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा । Karla News