Dainik Maval News : पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात ‘पीएमपीएमएल’ची मावळ तालुक्यात तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आणि टाकवे बुद्रुक या ठिकाणांपर्यंत बस सेवा सुरु आहे. परंतु पवन मावळ विभागातील तीस ते चाळीस गावांसाठी प्राथमिक बाजारपेठ असलेल्या पवनानगर पर्यंत अद्यापही पीएमपी बस सेवा नाही. ( Nigdi to Pavana Nagar PMPML Bus )
पवनानगर येथे अनेक शाळा, विद्यालये आहेत. येथील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड, वडगाव, तळेगाव याठिकाणी नित्यनेमाने जात असतात. सोबत तळेगाव – चाकण – आंबी – पिंपरी आदी ठिकाणी दररोज कामासाठी जाणारा कामगार वर्गही मोठ्या प्रामणात आहे. तसेच तळेगाव – वडगाव – कामशेत आणि पिंपरीच-चिंचवड येथे विविध कारणास्तव जाणारा प्रवासी वर्गही मोठा आहे.
- परिसरातील गावातील हा घटक दररोज पवनानगर येथे येऊन पुढे खासगी वाहनांनी, जीप्स – पिकअप अशा वाहनांनी प्रवास करीत कामशेत येथे पोहचून नंतर पुढचा टप्पा गाठतो. हा प्रवास त्रासदायक व वेळखाऊ आहे. अशावेळी या प्रवाशांना थेट पवनानगर येथूनच निगडी पर्यंत पीएमपी बस सेवा उपलब्ध झाल्यास त्यांचा वेळ – पैसा आणि श्रम तिघांची बच होईल. यामुळे पवनानगर – निगडी पीएमपी बस सेवेची मागणी येथील प्रवाशांकडून होत आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येथील गावांना पवनानगर, तळेगाव, वडगाव शहरांशी जोडणारी फक्त लालपरी अर्थात एसटी बस ही एकमेव व्यवस्था आहे. परंतु एसटी बसची वारंवारिता आणि उपलब्धता ही विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक यांच्या सोईची नाही. दुसरीकडे थेट निगडी – पवनानगर ही पीएमपी बस सुरू केल्यास या घटकाला निश्चित वेळेत इच्छित स्थळी पोहचता येईल. यामुळे ग्रामीण भागातील या ठिकाणच्या नागरिकांकडून पवनानगर पर्यंत पीएमपी बससेवेची मागणी होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link