नीलकंठ गोरे उर्फ बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्रातील नामवंत वारकरी कीर्तनकार होते. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. पंढरपूरची वारी महाराष्ट्राचे एक आगळे वेगळे नवल विशेष आहे. विश्वाला आनंद, आश्चर्य देणारी ही वारी आषाढी आणि कार्तिक शुध्द एकादशीला संपन्न होते. आषाढी वारीला सर्व संताच्या पालख्या पंढरीला लाखो वारकरी भक्त भाविकासह आपआपल्या गावापासून पायी वाटचाल करीत टाळ, वीणा, मृंदगाचे नादब्रह्माच्या आनंदात पंढरीत येतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री बाबा महाराजांनी परंपरेची ही आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये लक्ष घालून अधिक आनंददायी केली. माऊलीच्या पालखीबरोबर असणाऱ्या दिंडीत सर्वात मोठा फड त्यांचा होता. सर्व प्रांतीय, सर्व जातीय, समानतेच्या शुध्द भावनेने ऊक्ती आणि कृतीचे ऐक्य असलेले वारकरी समाविष्ट. सुशिक्षित आणि युवा वारकरी संख्येचे आधिक्य संप्रदायाचे भजनानंदासह आरोग्य सांभाळीत, खेळ खेळीत, प्रवचन, कीर्तनाच्या आणि महाराजांच्या समवेत सर्वसोयीयुक्त सुखमय पंढरीची आनंदवारी दिनक्रमानुसार काकडा, भुपाळी, नित्यपाठाचे, पंचपदीचे भजन, विविध रागदारीतील नामधुन, हरिपाठ, आरती इत्यादी सर्व ऊपक्रम दरवर्षी पालखी सोहळ्याबरोवर १००० वारकरी भक्तांची विनामुल्य सोय ते करत होते.
नाचु कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगीं ।।
या नामदेव महाराज यांच्या वचनानुसार खेडोपाडीं, सर्व तालुक्याच्या ठिकाणी आणि सर्वच भागात कीर्तनाचा प्रसार केला आहे. त्यांचे कीर्तन फक्त महाराष्ट्र या प्रांतात नव्हे तर त्यांनी भारताच्या अनेक राज्यातही प्रसार केला. आंध्र, कर्नाटक, गुजरात, चेन्नई, ऊत्तरप्रदेश या सारख्या भारताच्या अन्य राज्यातही प्रसार केला. सातारकर महाराज यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत कीर्तन केले आहे. त्यांनी भारत देशाबरोबरच प्रदेशातही कीर्तन केले आहे. त्यामध्ये इंग्लड आणि अमेरिका येथे केले आहे.
हेही वाचा – अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन
महाराजांनी आपल्या रोजच्या कीर्तनात अथवा प्रवचनातून केलेल्या उपदेशाच्या, आवाहनाच्या सादेला प्रतिसाद देत लाखो लोक त्यांच्या हातून पंढरीच्या पांडुरंगाची पवित्र तुळशीमाळ आपल्या गळ्यात धारण करत आहेत. कारण त्या माळेच्या पवित्र बंधनामुळे व्यसन सोडून चांगले जीवन जगण्याचा पक्का निश्चय करण्यास मन दृढ राहते. परिणामतः संपूर्ण कुटूंबच सात्विक जीवन जगु लागते. तुलसीमाळ धारण करताना पाळावयाचे नियम महाराज लिखीत स्वरुपात देतात. त्याचे लिखित स्वरूप तुळशीची माळ घालुन गुरुमुखाद्वारे ‘जय जय रामकृष्णहरी’ मंत्र घेणे हाच गुरु अनुग्रह होय. घातलेली तुळशीमाळ कधीही काढू नये. माळ घातल्यानंतर आपण वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ अशा सातारकर परंपरेशी निगडीत झालो, ही खूणगाठ बांधावी. त्या परंपरेतून वर्षभर जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना हजर राहावे, असे आहे.
त्यांच्या कीर्तनाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग, पुणे, पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासन, महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कार्यगौरव पुरस्कार आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती टस्ट, तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली, याशिवाय मुंबई, पुणे, पिंपरी, चिंचवड, सासवड, पैठण, अक्कलकोट, नागपूर, सोलापूर या नगरपालिकेतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देवून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. ( neelkanth gore alias baba maharaj satarkar passed away professor dattatray phatang paid tribute )
शब्दांजली -प्रा. दत्तात्रय महाराज फटांगडे (एम. ए, पीएच.डी.) (कीर्तनकार)
अधिक वाचा –
– एकदम अचूक आकडेवारी! निवडणूका जाहीर झालेल्या मावळातील 29 ग्रामपंचायतींचं अंतिम चित्र काय आहे? लगेच वाचा
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धा; पहिल्यांदाच पुरुषांसह महिलांचेही संघ सहभागी
– मावळ तालुक्यातील चंदनवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप