Dainik Maval News : दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झालेल्या आणि दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी निकाल जाहीर झालेल्या वडगाव नगरपंचायतीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी पदभार स्वीकार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत सभागृहात हा पदग्रहण समारंभ होणार आहे. वडगाव नगरपंचायत मध्ये अबोली मयूर ढोरे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आहेत. तर, पूनम भोसले, सुनीता ढोरे, अजय भवार, माया चव्हाण, आकांक्षा वाघवले, सुनील ढोरे, गणेश म्हाळसकर, अजय म्हाळसकर, वैशाली सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत.
तर, दिनेश ढोरे, रोहित धडवले, विशाल वहिले, अनंता कुडे, राणी म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर हे भाजपाचे आणि रूपाली ढोरे, सारिका चव्हाण हे अपक्ष असे नगरसेवक आहेत. पैकी रुपाली अतुल ढोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्वांचाच मंगळवारी पदग्रहण समारंभ आहे.
वडगाव नगरपंचायतीची निवडणूक होऊन जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदग्रहण करीत आहेत. त्यासह अद्याप उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांची नियुक्ती बाकी आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या १२ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या नवीन सदस्यांची पहिली बैठक आयोजित केली असून यामध्ये उपनगराध्यक्ष आणि दोन्ही स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होईल.
गट स्थापनेची प्रक्रिया सुरू
पक्षीय बलाबलानुसार नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी व भाजपा असे दोन गट स्थापन होणार असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांकडून गट स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. गट स्थापन होताना अपक्ष नगरसेविका रुपाली ढोरे या राष्ट्रवादीच्या गटात सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर अपक्ष नगरसेविका सारिका चव्हाण या पूर्वाश्रमीच्या भाजपच्या कार्यकर्त्या असल्याने त्यांचा समावेश भाजपच्या गटात होण्याची शक्यता वर्तवली जात असून याबद्दल अद्याप स्पष्टता मात्र नाही.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट
