व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक येथील इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ असे नामकरण

टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीच्या विकासाला मिळणार गती - नंदकुमार शेलार

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Industrial Estate at Takve Budruk to be renamed as Krishna Raoji Bhegde Indrayani Industrial Cooperative Estate

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक वसाहतीच्या विकासाला गती मिळणार असून या औद्योगिक वसाहतीचे पूर्वीचे नाव इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत हे बदलून आता ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, मावळ’ असे अधिकृतरित्या करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली.

शुक्रवार, दिनांक २ जानेवारी रोजी वडगाव मावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शेलार यांनी हि माहिती दिली. याप्रसंगी नंदकुमार शेलार यांसह सचिन उर्फ बाळासाहेब ढोरे, राजेश गाडे पाटील, अरुण वाघमारे, प्रा. सत्यजित खांडगे, बाळासाहेब गाडे पाटील, हर्षवर्धन शिंदे आदीजण उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी अनुकूल वातावरण मिळावे, याकरिता मावळभूषण स्व. आमदार कृष्णरावजी भेगडे साहेब यांनी तत्कालीन परिस्थितीतही टाकवे बुद्रुक येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. यामुळेच आज मावळ तालुक्यातील या भागात उद्योगविस्तार होत असून स्व. भेगडे साहेब यांचे नाव औद्योगिक वसाहतीस देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व त्यानुसार हे नामकरण होत असल्याचे श्री शेलार यांनी सांगितले.

मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, मावळभूषण माजी आमदार स्व. कृष्णरावजी भेगडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आकाराला आलेल्या या वसाहतीच्या नामकरणास सहकार विभागाने अधिकृत मंजुरी देत कागदोपत्री शिक्कामोर्तब केले आहे, अशी माहिती नंदकुमार शेलार यांनी दिली.

कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत –
मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसरात वसलेली कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत ही उद्योजकांसाठी विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे. लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना एकत्र आणत उद्योजकांना जागा, पाणीपुरवठा, वीज तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. सध्या वसाहतीमध्ये एकूण २५ पैकी १९ कारखाने कार्यरत असून येत्या काळात अनेक नवीन उद्योग येथे दाखल होणार आहेत. यामुळे मावळ परिसरात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेत प्रातिनिधिक अनावरण –
तळेगाव दाभाडे येथे मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या ११व्या वर्षातील दुसऱ्या दिवशी, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी औद्योगिक वसाहतीच्या नामकरण केलेल्या नामफलकाचे प्रातिनिधीक अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुणजी फिरोदिया, मालपाणी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मा. संजयजी मालपाणी तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लवकरच कमानीचे भूमिपूजन –
नामकरणानंतर औद्योगिक वसाहत संस्थेच्या आवारात मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या आवारात स्व. भेगडे साहेबांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली. सध्या संस्थेचे अध्यक्षपद श्री. शेलार हे संभाळत असून कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश खांडगे, राजश्री म्हस्के, सचिन उर्फ बाळासाहेब ढोरे, अरूण वाघमारे आदी सहकारी कार्यरत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जानेवारी महिन्याचे वेळापत्रक जाहीर
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला
– कामशेतमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून एकेरी वाहतुकीचा पर्याय, 1 जानेवारीपासून अंमलबजावणी ; पाहा कुठून एन्ट्री, कुठे होणार एक्झिट


dainik maval jahirat

Previous Post

Savitribai Phule Jayanti : तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

वडगाव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा मंगळवारी पदभार स्वीकार समारंभ ; ‘या’ तारखेला होणार उपनगराध्यक्षांची निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक यांचा मंगळवारी पदभार स्वीकार समारंभ ; 'या' तारखेला होणार उपनगराध्यक्षांची निवड आणि स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.