तामिळनाडूमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एका ट्रेनच्या डब्याला भीषण आग ( Train Fire In Tamil Nadu ) लागल्याची घटना आज, शनिवारी पहाटे घडली. या आगीत ट्रेनचा डबा पूर्णपणे जळून खाक झाला असून या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लखनौहून रामेश्वरमला निघालेल्या या ट्रेनच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. ही एक खासगी टूरिस्ट ट्रेन असल्याची माहितीही समोर आली आहे. दुर्घटनेत 9 जण ठार तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. तसेच यासंदर्भात रेल्वेकडून अधिक तपास केला जात आहे.
मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळच्या सुमारास ट्रेन आली असता हा अपघात झाला. 9 पैकी 9 बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे समजत आहे. तसेच आग लागलेल्या डब्यात एकूण 55 प्रवासी होते, अशी माहिती समोर येत आहे. मदुराई यार्ड इथे खासगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयत्नांनी त्यांनी आग आटोक्यात आणली
दुर्घटनेत अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांपैकीच एकाने गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळेच आग लागली असावी, असे दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. ( Nine tourists from UP killed in train fire in Tamil Nadu Madurai )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पवन मावळातील शिळींब गावात भरली ‘भात पिक उत्पादन आणि तंत्रज्ञान विषयावरील शेतीशाळा’, युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– गुडन्यूज! मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती, काय आहे मिसिंग लिंक? वाचा
– ‘तळेगावमध्ये उभे राहणार बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र’, पणन मंत्री अब्दूल सत्तार यांची ग्वाही