व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘तळेगावमध्ये उभे राहणार बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र’, पणन मंत्री अब्दूल सत्तार यांची ग्वाही

बाजार समितीच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव इथे सुविधा उपलब्ध करणार - पणन मंत्री

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 26, 2023
in लोकल, महाराष्ट्र, शहर
Abdul-Sattar-In-Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्र संस्थेत सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी ग्वाही पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. अल्पसंख्याक विकास, औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सायंकाळी (दिनांक 23 ऑगस्ट) तळेगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला भेट देवून कामकाजाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. ( Training Center for APMC Officers and Employees to be set up in Talegaon Dabhade Says Minister Abdul Sattar )

यावेळी राज्याचे पणन संचालक शैलेश कोथमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक तथा सचिव संजय कदम, सरव्यवस्थापक तथा मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक अमोल यादव, संस्थेचे व्यवस्थापक विश्वास जाधव आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत मंत्री सत्तार म्हणाले, संस्थेने इतर विभागांशी समन्वय साधून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना संबंधित विषयावरील प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा.

त्याचबरोबर कृषी पणन मंडळाने राज्यातील बाजार समिती यांच्या पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी येणारा खर्च कृषी पणन मंडळाने संस्थेला द्यावा, जेणेकरून संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे संस्थेने जिल्हा बँका, नाबार्ड, कौशल्य विकास व अल्पसंख्यांक विभागाशी संपर्क साधून संस्थेत पूर्ण वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत. संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून नवीन प्रकल्प उभारावेत. संस्थेला पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद किंवा एमआयडीसी यांच्याकडे संपर्क साधावा, याकरिता आवश्यक ती मदत करता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोथमीरे यांनी राज्यातील बाजार समितीच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक काढण्यात येईल असे सांगितले. कदम यांनी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी डॉ. घुले यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी मंत्री सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. ( Training Center for APMC Officers and Employees to be set up in Talegaon Dabhade Says Minister Abdul Sattar )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– टाकवेत भाजपाचा कार्यकर्ता संवाद मेळावा; शरद बुट्टे-पाटील यांच्या उपस्थितीत आंदर मावळातील अनेक दिग्गजांचा पक्षात प्रवेश
– पुण्यात नव्हे पिंपरी-चिंचवडमध्येच ‘सायन्स सिटी’ उभारा; खासदार श्रीरंग बारणे यांची राज्य शासनाकडे आग्रही मागणी
– वडगाव मावळमध्ये शनिवारपासून राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धा, पाहा संपूर्ण वेळापत्रक


dainik maval jahirat

Previous Post

तालुक्यात सर्वाधिक बक्षिसे जिंकत पवनेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं; ‘गावात राहत असलो तरी बुद्धीच्या स्पर्धेत शिखरावर आहे’

Next Post

गुडन्यूज! मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती, काय आहे मिसिंग लिंक? वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mumbai-Pune-Missing-Link-Project

गुडन्यूज! मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार, मंत्री दादा भुसे यांची माहिती, काय आहे मिसिंग लिंक? वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.