Dainik Maval News : अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती कडून तळेगाव दाभाडे शाखेचे अध्यक्ष म्हणून निरंजन जहागीरदार व महिला आघाडी अध्यक्ष म्हणून जोत्स्ना वाडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मावळ तालुका, तळेगाव दाभाडे शहर शाखा व ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन शनिवारी तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी व पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड तुषार झेंडे यांच्या हस्ते करून मार्गदर्शन सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा सचिव ज्ञानेश्वर उंडे, जिल्हा अध्यक्ष ॲड तुषार झेंडे, महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष नयनाताई आभाळे, अध्यक्ष मावळ तालुका ऋषिकेश देशमुख, अध्यक्ष महिला आघाडी मावळ तालुका कामिनी कडू तसेच तळेगावकर नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करताना होणारी फसवणूक भ्रष्टाचार, प्रशासकीय अधिकाऱ्यांची अरेरावी अशा पद्धतीने सगळ्याच बाजूने ग्राहकाची होणारी पिळवणूक कुठेतरी थांबली पाहिजे. यासाठी संघटित होऊया व या लढ्यामध्ये सामील होऊन ग्राहक संघटीकरण करूया. आपली होणारी पिळवणूक फसवणूक भ्रष्टाचार याच्याविरुद्ध जाऊन आवाज उठवू या, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सहारा ग्रुपवर ईडीची कारवाई ; अॅम्बी व्हॅली सिटी येथे 707 एकर जमीन जप्त, बनावट नावांनी खरेदी केली होती जमीन
– वडगाव मावळ येथे सलग बारा तास महावाचन ; शासकीय कर्मचाऱ्यांकडून महापुरुषांना अनोख्या पद्धतीने अभिवादन
– महत्वाची बातमी : शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय
– मोठी बातमी : नगरपरिषद, नगरपंचायत, औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना हटविण्याचे अधिकार आता सदस्यानांच