व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, January 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम साखर कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्षपदी नाना नवले, उपाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची वर्णी

सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने ही निवडणूक कारखान्याचे संस्थापक विदुरा उर्फ नाना नवले यांच्या नेतृत्वात लढली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 16, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कासारसाई-दारूंब्रे येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज, बुधवारी (दि. १६ ) कासारसाई येथे कारखान्याच्या सभागृहात पार पडली. अपेक्षेप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी कारखान्याचे संस्थापक विदुरा उर्फ नाना नवले यांची एकमताने निवड झाली आहे. सोबतच उपाध्यक्ष पदी आश्चर्यकारकरित्या अनिल लोखंडे यांची निवड झाली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

  • मुळशी, मावळ, खेड, हवेली, शिरूर या पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व आहे. एकमेव हिंजवडी ताथावडे गटात झालेल्या निवडणूकीतही पॅनलचेच विदुरा उर्फ नाना नवले, दत्तात्रय जाधव, चेतन भुजबळ हे उमेदवार विजयी झाले होते. यासह कारखान्याचे सर्वच्या सर्व २१ संचालक हे शेतकरी विकास पॅनलचे आहेत.

मुळात निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले होते. परंतु हिंजवडी-ताथवडे गटात तीन जागांवर चार अर्ज शिल्लक राहिल्याने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच निवडणूक झाली. परंतु निवडणूक अंती शेतकरी विकास पॅनलचेच एकहाती वर्चस्व सिद्ध झाले. यानंतर प्रत्यक्ष अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाल्यावर ही निवडणूक मात्र अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली.

नाना नवले व अनिल लोखंडे यांची निवड
सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलने ही निवडणूक कारखान्याचे संस्थापक विदुरा उर्फ नाना नवले यांच्या नेतृत्वात लढली होती. तसेच हिंजवजी-ताथावडे गटातून निवडणुकीतही ते निवडून आले, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे नाना नवले ह्यांचीच कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. परंतु उपाध्यक्षपदी मात्र आश्चर्यकारकरित्या खेड-हवेली-शिरूर मतदारसंघातील संचालक अनिल लोखंडे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दोघांचे अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली.

( Shri Sant Tukaram Sugar Factory President Vice President election unopposed Nana Navale as President )


Previous Post

अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती तळेगाव दाभाडे शाखेच्या अध्यक्षपदी निरंजन जहागीरदार यांची निवड

Next Post

मुंबई-पुणे लोहमार्गावर धक्कादायक घटना ; सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shocking incident on Mumbai-Pune railway line Decomposed body of unidentified woman found in suitcase

मुंबई-पुणे लोहमार्गावर धक्कादायक घटना ; सुटकेसमध्ये आढळला अज्ञात महिलेचा कुजलेला मृतदेह । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Khadkala Zilla Parishad Group Maval Deepali Hulawale nominated by NCP

विकासाभिमुख नेतृत्व म्हणून कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात दीपाली हुलावळे यांच्या नावाची चर्चा !

January 23, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना भाजपाकडून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

January 23, 2026
name of BJP official candidate Ashatai Waikar is in news in Karla-Khadkala Zilla Parishad group

कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !

January 23, 2026
NCP opens campaign rally in Induri-Varale group Voters respond enthusiastically to campaign rally

राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 23, 2026
Bajaj Pune Grand Tour 2026 Luke Madgwe dominates Mulshi-Maval stage Harshveer Singh best Indian cyclist

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व ; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

January 22, 2026
Dharatirth Gadkot Mohim in Maval taluka after 23 years It will start on 23rd January

मावळ तालुक्यात तब्बल २३ वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम ! २३ जानेवारीला होणार आरंभ

January 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.