तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे ‘निर्भय कन्या अभियान’ व्याख्यानमालेचे आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी ही व्याख्यानमाला आणि शिबिर सत्र पार पडले. प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी व्याख्यानमालेचे उद्घाटन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महिलांचे मानसिक आरोग्य, महिलांची उद्यमशीलता आणि आर्थिक स्वावलंबन अशा विषयांवर व्याख्यानमालेत व्याख्याने झाली. महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढाच विचार न करता स्वतःच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी खंबीर झाले पाहिजे, असे मार्गदर्शन व्याख्यानातून करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Nirbhay Kanya Abhiyan lecture series at SavitriBai Phule Mahila Mahavidyalaya Talegaon Dabhade)
ह्यावेळी शिल्पा कशाळकर यांनी महिलांचे मानसिक आरोग्य यावर, तर संतोष वंजारी यांनी महिलांचे उद्यमशीलता आणि आर्थिक स्वावलंबन या विषयावर मार्गदर्शन केले. तर स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात दामिनी पथकाच्या महिला पोलिस अंमलदार सुनंदा जाधव यांनी महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले. यासह प्रफुल कवळे यांनी विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले. डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर, प्रा. सोमनाथ कसबे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
अधिक वाचा –
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून नवीन महानगरपालिका बनणार? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा
– राजकीय भूकंप! अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, आमदारकीचाही राजीनामा, भाजपवासी होणार? जाणून घ्या सविस्तर । Ashok Chavan Resignation