आमदार सुनिल शेळके यांनी सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावरील स्थानिकांची लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची दखल घेत तातडीने आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेऊन हा प्रश्न तात्पुरता मार्गी लावला आहे. आमदार सुनिल शेळके यांनी आज (दि. 8 जून) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील स्थानिक खासगी वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे आरसी बुक आणि आधारकार्डची प्रत आयआरबी कार्यालयात जाऊन नोंदणी केल्यानंतर एमएच-१४ पासिंगच्या पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनधारकांना पुणे – मुंबई महामार्ग (एनएच-४) वरील सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर पथकरातून आता सूट दिली जाणार आहे, असे आमदार शेळकेंनी सांगितले. तसेच सोमाटणे येथे आरसीबी बुक घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल, असेही सांगितले. ( no toll for motorists of maval taluka at somatne and varsoli toll plaza )
मावळ तालुक्यातील स्थानिक वाहनचालकांच्या वाहनांच्या फास्ट स्टॅगमधून सोमाटणे टोलनाक्यावर परस्पर पथकर वजा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत., “सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांची फसवणूक करून वाहन क्रमांकाद्वारे, फास्ट टॅगद्वारे टोल आकारणी केली जात आहे.ही टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा 10 तारखेला टोलनाका बंद करण्यात येईल”, असा इशारा आमदार शेळकेंनी दिला होता.
त्यानंतर तातडीने आयआरबीचे मुख्य पथकर अधिकारी नीलेश म्हेत्रे आणि सोमाटणे टोलनाक्याचे व्यवस्थापक महादेव तुपारे यांनी शनिवारी (दि. 8 जून) सकाळीच आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच याबाबतचे नवीन धोरण जाहीर केले. आमदार सुनिल शेळके यांनी ही माहिती माध्यमांना दिली.
केवळ नोंदणीकृत वाहनचालकांनाच मिळेल सवलत –
‘पथकरातून सूट मिळवण्यासाठी मावळ तालुक्यातील खासगी, पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनधारकांनी सोमाटणे टोलनाकयावरील आयआरबी कार्यालयात आरसी बुक आणि स्थानिक पत्ता असलेल्या आधारकार्डची प्रत जमा करावी, अशी नोंद करणाऱ्या वाहनचालकांकडून यापुढे पथकर आकारला जाणार नाही, असे आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा –
– कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !
– मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी