व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सोमाटणे, वरसोली टोलनाक्याचा प्रश्न तात्पुरता निकाली ! स्थानिकांची संपूर्ण टोलमाफी, वाचा काय म्हणाले आमदार सुनिल शेळके

आमदार सुनिल शेळके यांनी सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावरील स्थानिकांची लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Toll-Plaza-Maval

Photo - Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांनी सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावरील स्थानिकांची लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्याची दखल घेत तातडीने आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेऊन हा प्रश्न तात्पुरता मार्गी लावला आहे. आमदार सुनिल शेळके यांनी आज (दि. 8 जून) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यातील स्थानिक खासगी वाहनधारकांनी आपल्या वाहनाचे आरसी बुक आणि आधारकार्डची प्रत आयआरबी कार्यालयात जाऊन नोंदणी केल्यानंतर एमएच-१४ पासिंगच्या पांढऱ्या नंबरप्लेटच्या खासगी वाहनधारकांना पुणे – मुंबई महामार्ग (एनएच-४) वरील सोमाटणे आणि वरसोली टोलनाक्यावर पथकरातून आता सूट दिली जाणार आहे, असे आमदार शेळकेंनी सांगितले. तसेच सोमाटणे येथे आरसीबी बुक घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल, असेही सांगितले. ( no toll for motorists of maval taluka at somatne and varsoli toll plaza  )

मावळ तालुक्यातील स्थानिक वाहनचालकांच्या वाहनांच्या फास्ट स्टॅगमधून सोमाटणे टोलनाक्यावर परस्पर पथकर वजा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत., “सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांची फसवणूक करून वाहन क्रमांकाद्वारे, फास्ट टॅगद्वारे टोल आकारणी केली जात आहे.ही टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा 10 तारखेला टोलनाका बंद करण्यात येईल”, असा इशारा आमदार शेळकेंनी दिला होता.

त्यानंतर तातडीने आयआरबीचे मुख्य पथकर अधिकारी नीलेश म्हेत्रे आणि सोमाटणे टोलनाक्याचे व्यवस्थापक महादेव तुपारे यांनी शनिवारी (दि. 8 जून) सकाळीच आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच याबाबतचे नवीन धोरण जाहीर केले. आमदार सुनिल शेळके यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

केवळ नोंदणीकृत वाहनचालकांनाच मिळेल सवलत –
‘पथकरातून सूट मिळवण्यासाठी मावळ तालुक्‍यातील खासगी, पांढऱ्या नंबरप्लेटच्या वाहनधारकांनी सोमाटणे टोलनाकयावरील आयआरबी कार्यालयात आरसी बुक आणि स्थानिक पत्ता असलेल्या आधारकार्डची प्रत जमा करावी, अशी नोंद करणाऱ्या वाहनचालकांकडून यापुढे पथकर आकारला जाणार नाही, असे आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा –
– कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त
– खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !
– मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळके यांचा एल्गार ! सोमाटणे टोलनाक्यावर मावळवासियांची होणारी लूट थांबवण्यासाठी स्वतः उतरणार मैदानात

Next Post

तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
career guidance seminar for 12th students

तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.