व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र आणि वास्तव्याच्या पुराव्याविना मिळणार रेशनकार्ड ; महाराष्ट्र सरकारचा निर्णय

भटके, विमुक्त जमातींकडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 6, 2024
in महाराष्ट्र
ration card without identity card and residence proof

Photo Courtesy : Team Dainik Maval


भटके, विमुक्त जमातींकडे ओळखपत्र व वास्तव्याचा पुरावा नसल्याने त्यांना शिधापत्रिका मिळण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून राज्यातील भटके विमुक्त जमातींना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना शिधापत्रिका मिळण्यासाठी ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भटके, विमुक्त जमातींतील बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना सर्वसामान्य जनतेप्रमाणे शिधापत्रिका वितरित करताना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील भटके विमुक्त समाजाचा व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मुलभूत अधिकार आहे. ही बाब विचारात घेता राज्यातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सहानभूतीपूर्वक विचार करून त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी सुलभ कार्यपध्दती अनुसरून त्यांना पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देऊन त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यासाठी नवीन शिधापत्रिकेसाठी २९.०६.२०१३ अन्वये निश्चित केलेल्या प्रचलित पध्दतीनुसार आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करून त्यांना ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.

भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांकडून नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज भरून घेऊन त्यांना शिधापत्रिका वितरित करण्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहिमेचे आयोजन करावे. मोहिमेंतर्गत भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरित करून त्यावरील लाभ देण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयांनुसार भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याने प्राप्त झालेले मतदार ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्याचे भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिक असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासासंदर्भात शहरी भागात नगरसेवक व ग्रामीण भागात सरपंच/उपसरपंचांचे त्या भागातील रहिवाशी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. यापैकी कोणतेही कागदपत्र व आधारकार्ड उपलब्ध नसल्यास अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र भरुन घेण्यात येणार आहे. ( Nomads freedmen will now get ration card without identity card and residence proof Decision of Maharashtra Govt )

अधिक वाचा –
– मावळात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करणाऱ्या ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेला मोठी मदत । Talegaon Dabhade
– मावळात लाडक्या बहिणींसाठी शासन गावात येणार ! 103 गावांमध्ये आणि 24 केंद्रांवर स्विकारले जाणार योजनेचे अर्ज, वाचा सविस्तर
– शाब्बास ! तळेगावचा ‘श्रीरूप जगताप’ शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दुसरा, कौतूकाचा होतोय वर्षाव । Talegaon Dabhade


Previous Post

महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या

Next Post

अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Karla News Shri Ekvira Devasthan Trust

अखेर निवड प्रक्रिया झालीच ! श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि दीपक हुलावळे । Karla News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Vidhan Sabha Former MLA Krishnarao Bhegde Passes Away Talegaon Dabhade

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

June 30, 2025
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवडीबाबत धोरण जाहीर – वाचा सविस्तर

June 30, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरणात 58 टक्के पाणीसाठा ! गतवर्षीपेक्षा 40 टक्क्यांहून अधिक जलसाठा । Pawana Dam Updates

June 30, 2025
Gopinath Munde Farmers Accident Safety Sanugraha Grant Scheme Documents Procedure Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकरी कुटुंबासाठी मोठा आर्थिक आधार !

June 30, 2025
Maval Taluka Marathi Journalists Association established Sudesh Girme elected as president see entire committee

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना; अध्यक्षपदी सुदेश गिरमे, कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

June 30, 2025
10 foot python found in Boraj village Maval Wildlife conservationists release python into natural habitat

बोरज गावात आढळला 10 फुटी अजगर ; वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांकडून अजगराची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

June 30, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.