Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि.२३) तळेगाव येथे पार पडली. मतमोजणीअंती महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी एकूण १ लाख ९१ हजार २५५ मते घेत आणि १ लाख ८ हजार ५६५ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळविला. तर अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे यांना दुसऱ्या क्रमांकाची ८२ हजार ६९० मते मिळाली.
मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण सहा उमेदवार होते. परंतु तिसऱ्या क्रमांकाची मते ही नोटा या पर्यायाला अर्थात वरील पैकी कुणीही नको या पर्यायाला मिळाली आहे. मावळात नोटाला २७१५ मते मिळाली आहेत. महत्वाची बाब म्हणजे सुनील शेळके आणि बापू भेगडे हे दोन उमेदवार वगळता उर्वरित चारही उमेदवारांना चार अंकी मते घेता आली नाहीत. त्यामुळे त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले आहे.
रवींद्र वाकचौरे यांना ७४९, मुकेश अग्रवाल यांना ५४५ मते, गोपाळ तंतरपाळे यांना ६१६ मते आणि पांडुरंग चव्हाण यांना ५११ मते मिळाली आहे. डिपॉझिट वाचविण्यासाठी मतदानाच्या १६.८० टक्के म्हणजेच किमान ४६५३२ मते मिळविणे आवश्यक होते. परंतु या चारही उमेदवारांना हजाराचाही टप्पा ओलांडता आला नसल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins
– अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी
– मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha