Dainik Maval News : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतदेखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.
दिनांक 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.
अधिक वाचा –
– विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News
– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News
– निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार