महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगाव मावळ शहराध्यक्षपदी कु. ओंकार नितीन भांगरे यांची निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी कु. दिनेश दत्तात्रय म्हाळसकर यांची निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनसेच्या वडगावमधील मावळगड येथील कार्यालयात तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ह्या निवडी जाहीर करण्यात आल्या. ( Omkar Bhangre Appointed City President Of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena Vadgaon Maval )
दिनांक 15 ऑगस्ट अर्थात भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वडगाव शहर कार्यकर्त्यांचा मेळावा मावळगड कार्यालय येथे पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन तसेच मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या युवा नेतृत्वाखाली काम व त्यांचे हात बळकट करण्यासाठी वडगाव मधील असंख्य तरुणांनी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला.
त्यावेळी कार्यकर्त्यांना तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. या दरम्यान मनसे विद्यार्थी सेना वडगाव शहर अध्यक्षपदी ओंकार नितीन भांगरे व उपाध्यक्षपदी दिनेश दत्तात्रय म्हाळसकर यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी मनसे ज्येष्ठ नेते तानाजी तोडकर, सुरेश जाधव, वडगाव शहर अध्यक्ष मच्छिंद्र मोहिते, महिला शहर अध्यक्षा अर्चना ढोरे, माजी शहराध्यक्ष गणेश भांगरे, अनिल नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते. ( Omkar Bhangre Appointed City President Of Maharashtra Navnirman Vidyarthi Sena Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नागरिकांनो, डोळ्यांची काळजी घ्या! डोळे येण्याच्या आजारापासून बचावासाठी वडगावात तब्बल 3000 आय ड्रॉपचे वाटप
– रेल्वे सुरक्षा बलाकडून व्हिपीएस विद्यालयात रेल्वे सुरक्षेचे धडे । Lonavala News
– दैनिक मावळ बुलेटीन : ‘पुणे मेट्रोचे स्टिअरिंग मावळ कन्येच्या हाती’ । ‘त्या’ ग्रामपंचायत सदस्यांवरील कारवाईला स्थगिती