Dainik Maval News : नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट ऑइल विक्री करण्याच्या उद्देशाने ऑइलचा साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गौरव श्रिगिरीश श्विवास्तव (वय ३८ वर्षे, रा. ओम विहार कॉलनी, इंदोर, मध्यप्रदेश) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी खुददोस रज्जाक शेख (वय ४२ वर्षे, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे) याच्यावर देहुरोड ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठलवाडी बायपास रोड, देहूगाव येथे शुक्रवारी (दि.२१ मार्च) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्याकडे कोणाताही प्रकारचा परवाना नसताना फिर्यादी यांच्या कॅसट्रॉल कंपनीच्या डब्यामध्ये त्याने बॅलरमध्ये भरुन आणलेला १ लाख ५० हजार ८५० रुपये किंमतीचा ऑइलचा माल हा बॉटलमध्ये भरुन ठेवला होता. तसेच फिर्यादीच्या कंपनीचे स्टिकर्स लावून पॅक करुन ते ऑइल विकण्याचे उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक वाघमारे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत । Sant Tukaram Sugar Factory Election
– सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल ; लोणावळा पोलिसांकडून शांतता व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, वाचा नियमावली । Pune News