Dainik Maval News : खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायत कार्यालयासमोर शहरातील विविध मागण्यांसाठी सोमवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणकर्ते संजय पडवकर, मनोज धावडे, विजय दौंडे यांनी हे उपोषण केले असून मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या?
१. कै. श्री. दिलीपभाऊ शोभाचंद टाटीया स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थी पुरस्कार योजना (इयत्ता १०वी, १२वी, पदवीधर) पुन्हा सुरू करून पुरस्कार प्रदान करावे,
२. पाणीपुरवठा वीजबिल थकीत रक्कम रुपये १,७५, ३२,८३० भरणा करणे व वीजपुरवठा सुरळीत करणे, सर्व वार्डमध्ये समान पाणीपुरवठा धोरण तत्काळ राबविणे,
३. आरओ फिल्टर पाणी प्लांट प्राथमिक शाळा, पंडित नेहरु विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळा येथे बसविणे,
४. सेवा हमी कायदा २०१५ नुसार ऑनलाईन सेवा नागरिकांना न देता (८-अ उतारे, जन्म मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्र) रक्कम १०,७८, ३८३ रुपये सुविधा न देता केलेला बेकायदेशीर खर्च वसूल करुन कारवाई करणे,
५. अंत्ययात्रा कामी वैकुंठरथ तयार करणे व नागरिकांच्या सुविधेकरीता तत्काळ उपलब्ध करणे
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number