Dainik Maval News : मावळ तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. या कंपनीच्या गोडाऊन समोर एका दुचाकीची कंटेनरला धडक बसली, यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
गोडाऊनमध्ये माल खाली करून निघालेल्या कंटेनरला (क्रमांक एमएच १४ ईएम ८६६२) टाकवे कडून कान्हे फाट्याच्या दिशेने जात असलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने कंटेनरच्या पाठीमागील चाकाला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील अज्ञात व्यक्ती वहानगाव येथील खासगी कंपनीत कामगार असल्याची प्रथामिक माहिती आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.
भरधाव कंटेनरच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू
वडगाव मावळ – वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला भरभाव कंटेनरने चिरडले, यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १३ मे) रात्री पाऊणे दहाच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव फाटा येथे घडली. अपघातात मिथुन वसंत धेंडे (वय ४९, रा. उरुळी कांचन, पुणे. सध्या कार्यरत, वडगाव पोलीस स्टेशन ता. मावळ जि. पुणे) अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून चाकणच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने तळेगाव फाटा येथे निष्काळजीपणे, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून व बेजबाबदार वाहन चालवून कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस मिथुन धेंडे यांना धडक देऊन चिरडले. यात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दहावीचा निकाल जाहीर : किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती उत्तीर्ण झाले, विभागनिहाय निकाल ; वाचा सविस्तर निकाल । SSC Result 2025
– दहावी परीक्षेत पवना विद्या मंदिरची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे पवनानगर केंद्रात प्रथम ! ग्रामीण भागात यंदाही मुलींचीच बाजी
– वाढदिवसाच्या आदल्या रात्रीच काळाचा घाला ; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडले ; वडगाव मावळ येथील दुर्दैवी घटना
– मावळात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश ! शस्त्रास्त्रे व मांस जप्त, आरोपी अटकेत ; वनविभागाची मोठी कारवाई