Dainik Maval News : देहूरोड येथे गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेचा एक सीसीटीव्ही ( CCTV VIDEO ) समोर आला असून सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
या घटनेमध्ये विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या घटनेमध्ये रेड्डीचा मृत्यू झाला आहे. रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान समोर उभा असलेल्या सराईत गुन्हेगाराने त्यांच्यावर फायरिंग केली. याच दरम्यान विक्रम गुरु स्वामी रेड्डीचा मृत्यू झाला आहे. तर इतर एक जण गंभीर जखमी आहे.
दरम्यान त्याआधी देखील सराईत गुन्हेगाराने केलेल्या मारहाणीत नंदकिशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सराईत गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ