Dainik Maval News : आमदार सुनील शंकरराव शेळके यांच्या संकल्पनेतून आदिवासी ठाकर-कातकरी समाजासाठी विशेष सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये घरकुल योजना, जातीचे दाखले, तसेच शिधापत्रिका काढण्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांना सहकार्य करण्यात आले. या अभियानाद्वारे शेकडो नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.
सेवा अभियान १२ आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महादेव मंदिर, गावठाण, शिळींब येथे आयोजित करण्यात आले होते. या अभियानाद्वारे तिकोणा, जवन नं.१, २, ३, आजिवली, वाघेश्वर, कादव, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी (कोटमवाडी), चावसर, मोरवे, तुंग आणि कोळे चाफेसर या गावांतील नागरिकांना आवश्यक सेवा प्रदान करण्यात आल्या.
- गुरुवारी (दि.१३) या अभियानाची यशस्वी सांगता झाली. अभियानाच्या समारोपप्रसंगी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले आणि मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष संतोष किसन कडू, शिळीम ग्रामपंचायत सरपंच सिद्धार्थ कडू तसेच, ग्रामस्थ राहुल जगताप, शहाजी कडू, मधुकर कडू, मधुकर केदारी, मधुकर पवार, महादू मोरे, रघुनाथ पवार, गणपत पवार, बबन धनवे उपस्थित होते. या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून अनेक आदिवासी ठाकर-कातकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला.
या अभियानामुळे अनेक गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला असून, भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिकांना मदत करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
अभियानातील प्रमुख निष्कर्ष
- जातीचे दाखले वितरीत: १७४
- घरकुल योजनेअंतर्गत अर्ज: ३७
- रेशनकार्ड प्रक्रियेसाठी अर्ज: ७०
- आभा कार्ड: २२
( Spontaneous response to the tribal Thakar Katkari service campaign in Shilimb Village Maval )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ