Dainik Maval News : केवळ सुनिल शेळकेवर आरोप करून, त्यांना बदनाम करण्यामुळे तुम्ही ही निवडणूक जिंकू शकणार नाही, असा टोला आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या विरोधकांना लगावला आहे. राज्यात महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. केंद्रातही महायुतीचेच सरकार आहे. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला निवडून दिले तरी तो तालुक्यासाठी किती विकास निधी आणू शकतो, असा सवाल आमदार शेळके यांनी केला.
आमदार शेळके यांनी मंगळवारी नवलाख उंब्रे, बधलवाडी, परिटवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी व सुदुंबरे या गावांचा प्रचारदौरा करीत जनसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ठिकठिकाणी वाजत-गाजत मिरवणुकीने, पुष्पवृष्टी करीत, फटाके वाजवून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
नवलाख उंबरे येथे गणेशआप्पा ढोरे, संतोष दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रम कदम, कृति समिती अध्यक्ष देविदास पडवळ, माजी उपसरपंच रवींद्र कडलक, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष जालिंदर शेटे, सरपंच सविता बदले, उपसरपंच राहुल शेटे, माजी सरपंच पांडुरंग कोयते, माजी उपसरपंच हनुमंत कोयते, मयूर नरवडे तसेच अशोक जगनाडे, नवनाथ पडवळ, युवा उद्योजक राजू कडलक, तानाजी पडवळ, चंद्रकांत कदम, लक्ष्मण नरवडे, बळीराम मराठे आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदुंबरे येथे जंगी स्वागत
सुदुंबरे गावात भव्य मिरवणुकीने आमदार शेळके यांचे स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. संत जगनाडे महाराज समाधी मंदिर परिसरत विकास आराखड्याच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांना धन्यवाद दिले.
गावाचा विकास अधिक गतीने होण्यासाठी आमदार शेळके यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. त्यावेळी सरपंच सविता गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदुंबरे अध्यक्ष संतोष गाडे तसेच ताराचंद गाडे, माणिक गाडे, मोहन काळडोके, बाळा अंबुले, जालिंदर गाडे, उमा शेळके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहरात पोलिसांचा रूट मार्च ; मावळ विधानसभेचे प्रमुख उमेदवार तळेगाव शहरात असल्याने विशेष दक्षता
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके