Dainik Maval News : पवनमावळ विभागात सद्यस्थितीत भात शेतीवर करपा व कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट होईल की काय, अशी चिंता शेतकरी वर्गाला आहे. तर करपा या रोगाचा प्रादुर्भाव पवनमावळ सह तालुक्यामध्ये मध्ये दिसू लागले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
करपा रोग नियंत्रणात आणन्यासाठी पवन मावळा मधील कडधे येथे भात पीक प्रकल्प अंतर्गत, येळसे, कोथुरणे, काले या गावात कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व भात संशोधन केंद्राचे भात शास्त्रज्ञ डॉ. किरणसिह सूर्यवंशी यांच्यासह मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक काळेकॉलनी नागनाथ शिंदे, कृषि सहाय्यक विकास गोसावी, शीतल गिरी, ओंकार लोखंडे क्षेत्रीय भेटी वेळी उपस्थित होते. ( Outbreak of Kada Karpa disease on paddy cultivation in Pawan Maval Division )
तालुक्यामध्ये कृषि विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करून, व्हॉट्सअप मेसेज, सोशल मीडियाच्या माध्यमातुन काय उपायोजना कराव्यात याची हि माहीती शेतकऱ्यांना पाठवत आहे. ज्याठिकाणी प्रशिक्षण, शेतीशाळा घेतल्या जात आहेत त्यामध्ये ही मार्गदर्शन करत आहेत. प्रत्यक्ष शेतीवर जाऊन कोणती औषध फवारणी करावी याची माहिती देण्यात येतं आहे.शेतकऱ्यांनी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास तात्काळ कृषि विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी. – प्रशांत डहाळे ( मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी )
मावळ तालुका हा पुणे जिल्हातील पश्चिमेचे टोक असुन हा तालुका कोकणपट्टीचा तालुका आहे. यामुळे मावळ तालुका हा भातशेती आगार म्हणुन या तालुक्याला ओळखले जाते. पवन मावळ भाग हा इंद्रायणी तांदूळासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. तर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातपिकाची लागवड केली जाते.यामध्ये तालुक्यामध्ये 12500 हजार हेक्टरवर भातशेती असुन यामध्ये इंद्रायणी या वाणाची 90% लागवड केली असुन ईतर जातींची 10 टक्के लागवड केली आहे.
अधिक वाचा –
–अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News
– शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News