आढले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पल्लवी संतोष वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. नायब तहसीलदार अमोल पाटील, तलाठी सचिन जाधव, ग्रामसेवक सुनिता चौधरी यांनी यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उपसरपंच पदासाठी पल्लवी संतोष वाघमारे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे विशेष सभेच्या अध्यक्षा म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णाताई घोटकुले यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नितीन साळुंखे, जयश्री घोटकुले, संतोष कदम, तानाजी घोटकुले, वंदना घोटकुले, मच्छिंद्र म्हस्के, प्रियंका घोटकुले, अश्विनी वाघमारे हे सर्व सदस्य उपस्थित होते. ( Pallavi Waghmare elected as deputy sarpanch of Adhale Budruk Gram Panchayat )
निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थ म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, नितीन घोटकुले, माजी सरपंच बाळासाहेब घोटकुले, तानाजी घोटकुले, ज्ञानेश्वर सावंत, संतोष सावंत, बाळासाहेब सपकाळ, गुलाब सावळे, भरत घोटकुले, अनिकेत सस्ते, शहाजी घोटकुले, दत्ताभाऊ सावंत, सुरेश घोटकुले, संकेत सस्ते, खंडू वाघमारे, अनंता कटके, रामभाऊ घोटकुले, मनोहर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, राजाभाऊ घोटकुले, बालेकारी नामदार नथू घोटकुले, संभाजी पात्र. वैभव भोईर, उमेश सावंत, अजय सावंत, असे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वेळेवर भरा, नाहीतर होईल कारवाई? काय आहेत नियम, जाणून घ्या
– स्तुत्य उपक्रम! सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी पाड्यावरील चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा
– राज्यातील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय!