Dainik Maval News : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) परीक्षा मे च्या सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द या गावातील पंकज बाळासाहेब पिंपरे ह्या मुलाने अवघ्या वयाच्या २२व्या वर्षी सनदी लेखापाल (सीए) बनण्याचा मान मिळविला आहे.
- पंकजची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्याचे वडील बाळासाहेब पिंपरे हे रिक्षा चालक आहे. पंकजचे शिक्षण हे टाकवे जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण लोणावळा येथे झाले. कोरोना काळात पंकजच्या कुटुंबावर आर्थिक महासंकट ओढवले, परीक्षेच्या नोंदणीसाठी पैसे नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांना दागिने गहाण ठेवून फी भरावी लागली.
कोरोनामुळे सीए परीक्षा उशीरा झाल्याने त्याला अर्ज भरायला वेळ मिळाला. ह्या संधीचे सोने करत त्याने दोन महिन्यांत सीए फाउंडेशन ची परीक्षा पास केली. पुढे वैयक्तिक संघर्षाशी सामना करत सीए इंटर चे दोन्ही ग्रूप्स पहिल्या प्रयत्नात पास करून समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला. नोव्हेंबर २०२४ हा त्याचा सीए फायनल चा पहिला प्रयत्न होता.
परीक्षेआधी आठ दिवस आधी झालेल्या त्याच्या आजीच्या निधनानंतर पंकज डगमगून गेला. दुर्दैवाने त्याला त्याच्या आयुष्यातील प्रथम अपयश झेलावे लागले, पण जिद्द सोडली नाही. पुढचा प्रवास काट्याचा आहे, हे जाणून पंकज न डगमगता आपल्या पालकांच्या व आपले मॅनेजरच्या मदतीने अवघ्या दीड ते दोन महिन्यात पंधरा ते सतरा तास अभ्यास करत सीए फायनल परीक्षा देत दैदिप्यमान गुण मिळवत सीए पदवी प्राप्त केली आहे.
आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरीही हार न मानता आपली जिद्द, चिकाटी, इच्छा शक्ती आणि संघर्षाचा सामना करत त्याने मिळवलेले यश हे कौतुकास्पद असून परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये त्याने नवी उमेद निर्माण केली आहे. त्याच्या या यशाबद्दल टाकवे ग्रामस्थांसह मावळ तालुक्यात त्याचे अभिनंदन होत आहे.
त्याच्या या यशामध्ये त्याचे वडील बाळासाहेब पिंपरे, आई सुजाता पिंपरे व त्याचे मित्र आणि मार्गदर्शक सीए गुरुदेव गरुड व सीए स्नेहल गरुड यांचा मोलाचा वाटा असल्याचे तो सांगतो. तसेच भविष्यात गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची तो इच्छा बाळगतो असे तो म्हणाला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News
– महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
– देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा
– महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय ! ‘गणेशोत्सव’ महाराष्ट्र राज्याचा अधिकृत ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित