मावळ तालुक्यातील आढले खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पप्पू चांदेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. आढले खुर्दच्या मावळत्या उपसरपंच चैत्राली पशाले यांनी त्यांच्या पदाचा निश्चित कालावधी पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदासाठी बुधवारी निवड प्रक्रिया पार पडली. यात पप्पूशेठ चांदेकर यांची उपसरपंच पदी निवड झाली. ( Pappu Chandekar Elected Unopposed Deputy Sarpanch Of Adhale Khurd Gram Panchayat Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
चैत्राली पशाले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच नंदा भालेसेन यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी पप्पू चांदेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या ग्रामसेविका पुनम जमदाडे यांनी चांदेकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. पप्पूशेठ चांदेकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
सरपंच नंदा भालेसैन, ग्रामसेविका पुनम जमदाडे, माजी उपसरपंच चैत्राली पशाले, योगेश (आण्णा) भोईर, मंदा घोटकुले, मंगेश येवले, सोनल जगदाळे आदीजण यावेळी उपस्थित होते. पप्पू चांदेकर यांच्या निवडीनंतर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आल्या.
हेही वाचा – महिला दिनाचा योग; शिलाटणे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी जनाबाई कोंढभर बिनविरोध
पै बाळासाहेब घोटकुले (भाजपा युवा मोर्चा) दत्ता केदारी (चेअरमन खरेदी विक्री संघ) मा सरपंच दत्तोबा चांदेकर, मा सरपंच भाऊसाहेब भोईर, पै महेंद्र भोईर (खजिनदार भाजपा युवा मोर्चा) प्रल्हाद भालेसेन, मा सरपंच दिनेश कदम, बाबुराव येवले, बाळकृष्ण चांदेकर, पांडुरंग घोटकुले, तुकाराम चांदेकर, गणेश भोईर, शिवाजी भोईर, किसन जगदाळे, किरण काटे, विनोद भोईर, अरुण चांदेकर, प्रतिकेत भोईर, सोमनाथ पशाले, ओंकार भोईर, श्रीकांत केदारी आदींनी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंचांचा सत्कार करत त्यांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिनी वडगाव शहरातील रणरागिणींचे रौद्ररुप, अवैध गावठी दारूचा कारखाना केला उध्वस्त
– तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल