Dainik Maval News : मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण सद्यमितीस 92 टक्के भरले आहे. यासह धरणातून सध्या 5000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणाच्या आवकेत वाढ झाली आहे. ही परिस्थिती विचारात घेत, शुक्रवारी दुपारी तीन वाजता धरणाच्या सहाही दरवाजातून एकूण 3600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तर जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने सध्या धरणातून 5000 क्युसेक इतक्या क्षमतेने विसर्ग पवना नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने आणि पूर नियंत्रण कक्षाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शुक्रवारी दिवसभरात पवना धरण परिसरात तब्बल 85 मीमी पाऊस झाला. मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत असल्याची परिस्थिती आहे. गावागावातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असून भातखाचरे देखील तुडूंब भरली आहे. चालू हंगामात आतापर्यंत 2216 मीमी पाऊस झाला असून यंदाच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे जास्त पाऊस होताना दिसत आहे. पवना धरणात आजमितीस 92 टक्के पाणीसाठा आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सध्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परंतू परिस्थिती पाहून हा विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो. ( Pavana dam is 92 percent full Discharge of 5000 cusecs started )
अधिक वाचा –
– स्व. संकेतदादा असवले प्रतिष्ठानकडून सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा कायम ; विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप । Maval News
– देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतची कोंडी फूटणार ; नवीन डीपीआर मंत्रीमंडळासमोर, खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! मावळात दोन ठिकाणी अंमली पदार्थांसह १८ लाखांचा मुद्देमाल जप्त