मावळ तालुक्यातील पवना धरण जलाशयात बुडून एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पवनमावळ भागातील चावसर गावाजवळ ही घटना घडली. आपदा मित्र मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी आज (शनिवार, दिनांक 3 जून) रोजी सदर व्यक्तीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवार (दिनांक 2 जून रोजी) सायंकाळी ही व्यक्ती पाण्यात बुडाली होती. पवना डॅम धरणात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण बबन साठे (वय 40) असून ते राहणार साठेसाई (तालुका मुळशी, जिल्हा पुणे) येथील असल्याचे समजते. सदर व्यक्तीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी खंडाळा येथील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ( person from mulshi taluka drowned in pavana dam in maval taluka )
वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या सदस्यांनी शोधमोहिम राबवून मृतदेह पाण्याबाहेर काढला. निलेश गराडे, अनिल आंद्रे, अमित गुरव, गणेश ढोरे, रमेश कुंभार हे जण यात सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नागरिक सेल सल्लागार पदी पोपटराव वहिले यांची निवड
– बऊर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन मोहोळ बिनविरोध