Dainik Maval News : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना 18 एप्रिल रोजी रात्री सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे येथे घडली.
बाळासाहेब उद्धव वायकर (३७, शिरगाव, मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश संपत निकम (25, पवनानगर, मावळ), दिनेश मावजी पटेल (33, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळासाहेब हे 18 एप्रिल रोजी रात्री सोमाटणे फाटा येथील एका दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी यांनी दुकानदार कुमार अशोक निकम यांच्याशी आर्थिक कारणावरून भांडण केले.
हे भांडण सोडविण्यासाठी बाळासाहेब गेले असता आरोपींनी बाळासाहेब यांना बेदम मारहाण केली. यामध्ये बाळासाहेब यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार